नागरिकांनी डेंग्यू ला घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट देऊन तपासणी करून घ्यावी.डाॅ मनोज चौधरी यांचे आवाहन
तळेगाव दाभाडे :डेंग्यू च्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी डेंग्यू ला घाबरून न जाता तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ अधिकारी डॉ मनोज चौधरी यांनी केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून कीटकजन्य आजार डेंगू चिकनगुनिया रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्यावतीने नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत असून माहिती पत्रके वाटप करण्यात आली आहे. सध्या सर्व आशा सेविका व आरोग्य सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जे घरातील पाणीसाठे आहे ते आठवड्यातून एकदा रिकामे करावे. ड्रम. पाण्याच्या टाक्या. कुंड्या. फ्रिज मागील भाग. टायर व इतर पाणी साठे त्यामुळे डासांचे पैदास होणार नाही जे पाणीसाठे रिकामे करता येत नाही त्यामध्ये गप्पी मासे आरोग्य सेवकांमार्फत सोडण्यात येतील. तसेच ज्यांना ताप आला असेल अशा रुग्णांनी आरोग्य सेवक किंवा आशा सेविका घरी भेट देतील त्यावेळी त्यांना माहिती द्यावी व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी व उपचार करून घ्यावे. नगरपरिषदेच्या व शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू स्वच्छतेचे कार्ड दिले असून त्यावर घरातील पाणीसाठे आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे व त्याची नोंद सदरील कार्डमध्ये करावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून सहकार्य करावे व आपले तळेगाव शहर डेंग्यू मुक्त ठेवावे. तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये जाऊन डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांना स्क्रीनवर माहिती दिली जात आहे. आपले घर व शहर डेंग्यू चिकनगुनिया आजारापासून मुक्त होईल यासाठी पंचायत समिती वडगाव मावळचे आरोग्य पर्यवेक्षक दिलीप ठोंबरे. आरोग्य सहाय्यक दीपक ढवळे.L S O जयश्री लोहकरे. आरोग्य सेवक संदीप थरकुडे हे वरिष्ठ अधिकारी काम करत असून तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील नागरिकांची जनजागृती करण्यासाठी ५००० जनजागृती पत्रिका तयार करून वाटप करण्यात आले आहे. नगरपरिषदेमार्फत धूर फवारणी करण्यात येत आहे.३० डास उत्पत्ती स्थानकामध्ये गप्पी मासे सोडले आहेत.





