मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार तर कार्यध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची निवड

SHARE NOW

वडगाव मावळ दि.१ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघ मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर उपाध्यक्षपदी विशाल कुंभार, महादेव वाघमारे, कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे, सचिवपदी योगेश घोडके यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. तसेच मावळचे माजी आमदार शिक्षण महर्षी तसेच ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव भेगडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विजय सुराणा, बाळासाहेब वाघमारे, भारत काळे, निलेश ठाकर, अभिषेक, यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन ठाकर म्हणाले की, मावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांना अडचणी जाणून घेऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपने उभा राहणार तसेच समाजात वावरताना पत्रकारांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी मी समर्थ राहील. व तालुक्यातील पत्रकारांना आरोग्याच्या सुविधा सवलीतत उपलब्ध करून देणार व पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबांला विम्याचे कवच उपलब्ध करून देणार आहे.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिषेक बोडके, सूत्रसंचालन विशाल कुंभार, तर आभार सचिन ठाकर यांनी मानले

 

नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे

मुख्य प्रवर्तक : विजय सुराणा (सकाळ)

अध्यक्ष : सचिन गो. ठाकर ( लोकमत)

उपाध्यक्ष : विशाल कुंभार( दै.मावळ) , महादेव वाघमारे ( मावळ २४ तास)

कार्याध्यक्ष : दिलीप कांबळे ( साम टिव्ही)

सचिव: योगेश घोडके( लोकमत)

सहसचिव : दक्ष काटकर (सकाळ)

खजिनदार : विकास वाजे( लोकमत)

प्रकल्प प्रमुख : रवि ठाकर( प्रभात)

पत्रकार परिषद प्रमुख : अतुल चोपडे( प्रभात)

सल्लागार : बाळासाहेब वाघमारे(सकाळ) , दतात्रय म्हाळसकर(महाराष्ट्र लाईव्ह १) , भारत काळे(सकाळ), सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह १)

सदस्य : निलेश ठाकर(प्रभात) , सतीष गाडे( नवराष्ट्र) , संजय दंडेल,( सह्याद्री वार्ता) संजय हुलावळे(प्रभात), धनंजय नांगरे(इंद्रायणी वार्ता) , अभिषेक बोडके( प्रजावार्ता) , सचिन सोनवणे(पुण्यनगरी) राहुल सोनवणे( पुढारी) , गणेश दूडम,( न्यूज १८ लोकमत) सुनील आढाव (इंद्रायणी वार्ता), मुकुंद परंडवाल(सकाळ)


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page