*वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 तळेगाव दाभाडे , नगरपरिषद येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.*
तळेगाव दाभाडे :

लहान मुलांना आजारपणात किंवा घरी दुखापत, अपघात झाल्यावर नीट हाताळता येण्यासाठी *मूल सुरक्षित राहण्याकरिता प्रथमच पालकांकरिता प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर वर्ग सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर ठीक सकाळी 11 वाजता वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर केदार वळसंगकर ( MD Naturupathy) यांनी प्रथमोपचार संदर्भात मार्गदर्शन केले.
Advertisement
या कार्यक्रमासाठी शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या मुली व 110 पालकांनी उपस्थिती नोंदविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर सांगळे सर व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट मॅडम यांनी केले.
शाळेतील सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.






