खेळ, संघभावना आणि एक वेगळी ऊर्जा!

SHARE NOW

पुणे :

पहिल्यांदाच खासदार सिलेब्रिटी क्रिकेट लीगमध्ये नेत्यांच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पहिलाच सामना नेते विरुद्ध अभिनेते असा होता आणि मैदानावरचा हा अनुभव खूपच आनंददायी ठरला! कारण क्रिकेट हा माझा स्थायीभाव आणि बालपणीच्या आठवणींची शिदोरीही !

नेहमीच लोकांच्या प्रश्नांमध्ये, मंत्रालयाच्या कामकाजात, राजकीय आणि संघटनात्मक कामात गुंतलेलो असलो, तरी आज मैदानावर संघबांधणी, उत्साह आणि खेळातून मिळणाऱ्या आनंदाचं वेगळंच समाधान मिळालं !

या सामन्यात सहकाऱ्यांसोबत मैदानावर उभं राहणं, कलाकारांविरुद्ध खेळणं आणि सर्वांनी मिळून हास्यविनोद करत खेळाचा आनंद घेणं, यातून मिळालेली उर्जा निश्चितच मोठी होती !खेळ भावना ही नक्कीच आपल्याला अधिक जवळ आणते, भावनांचे बंध अधिक घट्ट करते.

Advertisement

कलाकार संघात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार सहभागी झाले. त्यात प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, संजय जाधव, उपेंद्र लिमये, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, समीर धर्माधिकारी, महेश लिमये व राधा कुलकर्णी यांचा समावेश होता. प्रवीण तरडे यांनी कलाकार संघाचे नेतृत्व केले.

आमच्या नेत्यांच्या संघात आमदार सुहास बाबर, माजी आमदार सुनील टिंगरे, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, नगरसेवक नाना भानगिरे, विशाल धनवडे, किशोर शिंदे, रुपाली पाटील, सागर पाठक, मंदार जोशी व पुढारीचे योगेश जाधव यांनी नेत्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले.

या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजनाबद्दल रमेश परदेशी, सागर पाठक, चेतन धोत्रे व आनंद कुंदुर यांचं मनःपूर्वक अभिनंदन


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page