तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांचे निलंबन
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील(एन.के.पाटील) यांनी ०१.०६.२०२४ रोजी स्कॉर्पिओ क्र.एमएच १३ इसी ९६३३ हे वाहन मानवी जिवितास धोका होईल अशा प्रकारे निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली.आणि पळून गेल्यामुळे पोलीस स्टेशन तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांच्या रक्ताची न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेत तपासणी केली असता त्यांनी मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच नगर परिषदेतील महिला कर्मचा-याशी असभ्य वर्तनाचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी याबाबत सोमवारी(दि.०८)आदेश देण्यात आला आहे.पुढील आदेशा पर्यंत निलंबन असणार आहे.