गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे :
आज दिनांक ८ जुलै २०२४ रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत औक्षणाने व कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान इंद्रायणी महाविद्यालयाचे कार्यवाह माननीय चंद्रकांत शेटे साहेब यांनी भूषविले .या प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर चे सदस्य माननीय श्री संदीप काकडे सर, प्राचार्य डॉ. एस. के. मलघे सर उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले सर ,डी फार्मसी प्राचार्य प्रा. शिंदे सर, माननीय गोरख काकडे, पर्यवेक्षिका प्रा.यु.एस. दिसले मॅडम, तंत्र शिक्षण विभाग प्रमुख प्रा. एन.टी. भोसले सर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.व्ही .व्ही .भेगडे मॅडम, शास्त्र विभाग प्रमुख प्रा. यू.एस .खाडप सर, कला विभाग प्रमुख प्रा.के .डी .जाधव सर, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. पी .एन. गाडेकर मॅडम व सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस .पी. भोसले सर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार समारंभ पार पडला. सत्काराला उत्तर देताना विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यामध्ये दिव्या भेगडे, सार्थक पडवळ व वैष्णवी मराठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वतःच्या यशात महाविद्यालयाच्या योग्य मार्गदर्शनासाठी कृतज्ञता व्यक्त केली . शिक्षक सत्कारांमध्ये प्रा.आर .आर .डोके ,प्रा. उषा भोसले ,प्रा.संध्या केदारी, प्रा.भाग्यश्री दाभाडे, प्रा.प्रतिभा जाधव ,प्रा.स्नेहल काशीद प्रा.सविता जोंधळे व प्रा. संगीता झरेकर या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले सत्काराला उत्तर देताना शिक्षकांच्या मनोगतात प्रा.भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी प्रेरित केले. विचाराला कृतीत घेऊन जाणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास आणि याच आत्मविश्वासाला आकार देऊन स्वप्न साकार करा हा विचार त्यांनी मांडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनापर संवादात प्राचार्य.डॉ. एस .के. मलघे सर यांनी भावी आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना कसलीही अडचण आली तरी महाविद्यालय सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा आश्वासक शब्द दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्यवाह माननीय चंद्रकांत शेटे साहेब यांनी विज्ञान शाखेने मावळ तालुक्यात प्रथम येण्याची परंपरा जपलेली आहे याचे विशेषत्वाने कौतुक केले व इतर शाखांनीही भविष्यात यशाची शिखरे अशीच पादाक्रांत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेच्या विकासाचा आढावा घेताना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामदास (आप्पा) काकडे साहेब यांच्या धोरणांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक सुदृढता महत्त्वाची आहे व याकडे महाविद्यालय विशेषत्वाने लक्ष देते हे सांगताना सुसज्ज मैदान व नवीन इमारतीबद्दल उल्लेख केला. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका प्रा .यु .एस. दिसले मॅडम यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीप्ती कन्हेरीकर ,प्रा. शैलजा शिंदे व प्रा.मेघा कुटे यांनी केले.