हुक्का, हुक्का फ्लेवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असलेल्या दोघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची धड़क करवाई.
लोणावळा :
जिल्हाधिकारी पुणे यांनी पर्यटकांच्या पारित केलेल्या नियमांचे, आदेशाचे उल्लंघन करून हुक्का, व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करित असलेल्या दोन इसमांवर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमधे भा. द. वि. संहिता २०२३ च्या कलम २२३ व तंबाखूजन्य उत्पादने २०१८ च्या कलमअन्वये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक मा.श्री.पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंदयावर करवाई करून त्याचे उच्चाटन, निर्दालन करण्याचे आदेश दिलेत याच अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून, छुप्यारुपाने अवैधधंदे करणारे त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी करवाई केली.ही कारवाई पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपड़े, सहा.पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. दि.६/७/२४ रोजी ५.४५ वा. आतवण गावाच्या हद्दीत टायगर पॉइंट येथे मंगेश स्नॅक्स सेंटर या दुकानात मंगेश कराळे वय २५, रा.खंडाळा ,राकेश गणपत बारे वय २५ रा.खोपोली, हे मंगेश स्नॅक्स सेंटर येथे मानवी जीवितास धोका निर्माण होणारा व शासनाने बंदी घातलेल्या वस्तु,१, हुक्का पिण्याच्या काचेचा पॉट पाइप सह त्याची की.२०००/,२, हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे रॉयल स्मोकिंग कंपनीचे मंगाईपान फ्लेवर चे १पैकेट,याची की.१००/,३,हुक्का पिण्यासाठी वापरन्यात येणारे रॉयल स्मोकिंग कंपनी चे कीवी,ब्लास्ट फ्लेवर चे २ पैकेट याची की.२००/४,हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनीचे डबल एप्पल फ्लेवर चे १पैकेट याची की.१००/. तसेच हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे अब्जल कंपनी चे औरेज फ्लेवर चे १पैकेट याची की.१००/असा एकुण २५००/ रु.चे साहित्य सह ताब्यात मिळून आले यावरून त्यानी जिलाधिकारी पुणे यांनी दिलेल्या आदेशाचे,उल्लंघन केले आहे.म्हणून त्यांच्या विरुद्ध वेदिका रामराव शीर्षे वय ३२,व्यवसाय वनरक्षक, रा.वडगांव मावळ ,महालक्ष्मी मंदिर,केशवनगर,यांनी सरकार च्या वतीने फिर्याद दिल्याने भा. द. वि.संहिता२०२३च्या कलम २२३ अन्वये सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादनांचा व्यवसाय ,व्यापार, पुरवठा,वितरण अधिनियम २००३ चे सुधारित अधिनियम २०१८ कलम,४(अ),२१(अ) अन्वये त्यावर हा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार गाले. बक्कल नं,१९९० लोनावला ग्रामीण पोलिस स्टेशन , करित आहे. ही कारवाई पुणे,ग्रामीण पोलिस अधीक्षक,पंकज देशमुख,पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक, रमेश चोपड़े, सहा. पोलिस अधीक्षक,तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,(आय . पी. एस.) लोनावला विभाग,सत्यसाई कार्तिक,यांच्या मार्गदर्शनाखली लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक,किशोर धुमाळ ,पोलिस हवालदार जय पवार,पोलिस कॉ.सिद्धेश्वर शिंदे,यांनी या कारवाईत सहभाग घेतला.