एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयात “त्रिपुरारी पौर्णिमा” उत्साहात साजरी
तळेगाव दाभाडे :
माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील श्री विश्वनाथ महाकालेश्वर शिव मंदिरामध्ये बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी “त्रिपुरारी पौर्णिमा” निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Advertisement
यावेळी संस्थेच्या कार्यकारी संचालिका, डॉ. सुचित्रा नागरे यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ दीपा नायर, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच रुग्णालयात रुग्णांना भेण्यासाठी येणारे भेटींदार या दीपोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते.






