पिंपरी येथील सिंधी समाजाच्या वतीने बाबा झुलेलाल मंदिर येथे चेटीचंद महोत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन
पिंपरी :
पिंपरी येथील सिंधी समाजाच्या वतीने बाबा झुलेलाल मंदिर येथे चेटीचंद महोत्सवानिमित्त एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या मधे पुढील निर्णय घेण्यात आले दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजता चेटीचंद महोत्सवानिमित्त बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे पिंपरी येथील बाबा झुलेलाल मंदिर येथुन सुरुवात होऊन दुर्गामाता मंदिराजवळ सांगता होईल तसेच सायंकाळी चार वाजता बाबा झुलेलाल मंदिर येथुन शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्या मधे विविध वाद्ये, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले सिंधी समाजातील नागरिक सहभागी होणार असून जागो जागी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे या बैठकीस समाजातील सामाजिक कार्यकर्ते महेश मोटवानी, मनोहर जेठवानी,पवनभाई, जवाहर कोटवानी, दिपक लोहाना आदींनी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने सिंधी समाजातील नागरिक उपस्थित होते