बधलवाडी : ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा दौरा — नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

SHARE NOW

इंदोरी :

बधलवाडी येथे ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांचे दर्शन घेऊन मेघाताई भागवत यांनी गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींशी भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान नागरिकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास दिला. नागरिकांचे हे प्रेम आणि पाठबळ पाहून मेघाताई भावुक झाल्या आणि “हीच जनतेची उर्जा मला लढण्यासाठी नवी ताकद देते,” असे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार म्हणून मेघाताई भागवत यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या गावभेटी, संवाद दौरे आणि जनसंपर्क मोहिमांना गावोगावी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समाजकारणाशी निगडीत कार्य, साधेपणा आणि लोकांशी असलेली आपुलकी यामुळे मेघाताई भागवत यांच्याबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाईल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

 

त्याचप्रमाणे, प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांना सर्वसामान्य लोकांच्या समस्यांची व अडचणींची जाण असल्यामुळे ते वेळोवेळी गावांमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतात, असे नागरिकांनी यावेळी मत व्यक्त केले. “आमच्या आनंद-दुःखात ते नेहमी सहभागी होतात, गावातील प्रत्येक घराशी त्यांचा आत्मीय संबंध आहे,” असे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे बधलवाडीसह परिसरात भागवत दाम्पत्यांविषयी आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या कार्यशैलीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page