मावळच्या मुख्याध्यापकांची कृषी पर्यटन केंद्राला भेट
शिरगाव :
मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी शैक्षणिक तसेच अनुभवात्मक पर्यटनाचा भाग म्हणून खेड तालुक्यातील अवनी कृषी पर्यटन केंद्राला रविवारी भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण पर्यटन, कृषीपूरक उपक्रम व नैसर्गिक शिक्षण यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा होता.
या शैक्षणिक दौर्यात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे, मुख्याध्यापक रमेश फरताडे, अजिनाथ ओगले, सतीश हाके, सुनील झेंडे, विष्णू मेदगे, नितीन कदम, सुनिता कामराज, सीमा पिल्ले, सुमेधा पारखी, माधुरी गायकवाड, हेमलता कोकणे, हे उपस्थित होते.
सागर एज्युकेशन टूरच्या वतीने मोहित लोंढे आणि राजेश सुटे यांनी या शैक्षणिक सहलीचे उत्कृष्ट आयोजन केले. उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी कृषी पर्यटन केंद्रातील उपक्रम, नैसर्गिक शेती पद्धती, ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी अशा पर्यटन उपक्रमांचा लाभ कसा होऊ शकतो यावर चर्चा केली.
या भेटीद्वारे शिक्षणासोबतच कृषी, पर्यावरण आणि पर्यटन यांचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला.






