मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
तळेगाव दाभाडे: इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज ठरत असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले
आज महिंद्रा एक्सिलो वराळे चाकण यांच्या सी.एस .आर फंडातून ॲड पु. वा. परांजपे विद्यामंदिरामध्ये डिजिटल स्कूल उपक्रमांतर्गत सर्व वर्ग खोल्यांमध्ये बसवण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष खांडगे बोलत होते
यावेळी महिंद्रा एक्सिलो वराळे चाकण या कंपनीचे संजय सोनकुमार, लक्ष्मण महाले , प्रसाद पादिर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, अशोक काळोखे, विलास पानसरे, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, इंदोरी शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा शितोळे,पैसाफंड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे,निराली मॅडम, संदिप पानसरे, लक्ष्मण मखर आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्राची बदलती ध्येय व केंद्रस्थानी असणारा विद्यार्थी वर्ग यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानयांची ओळख व विविध तंत्र कौशल्य हाताळण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्ययनामध्ये हे स्मार्ट बोर्ड निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत
यावेळी लक्ष्मण महाले म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी बदलत्या तंत्रज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी शाळांमध्ये तंत्रज्ञानाशी निगडित अनेक साधने व साहित्यांचा उपयोग अध्ययन अध्यापनात करणे क्रमप्राप्त ठरत आहे कंपनीच्या सीएसआर फंडातून डिजिटल इंडिया स्मार्ट बोर्ड यांच्या माध्यमातून विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय भर पडली आहे
यावेळी संजय सोनूकुमार बोलले की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या विचारातून साकारलेल्या शिक्षण संकुलामध्ये आम्हाला हे करण्याची संधी मिळाली हे आमचे सद्भाग्य
महात्मा गांधीजींनी सांगितलेले आहे खेड्याकडे चला खरा भारत देश हा ग्रामीण भागातून विकसित झाला तरच भविष्यामध्ये भारत हा महासत्ता बनेल त्यासाठी वर्तमान काळातील विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेता येईल अशा तंत्रज्ञानाची ओळख आणि ज्ञान असणे आवश्यक आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले