माजी शिक्षणमंत्री कै. रामकृष्ण मोरे यांची पुण्यतिथी साजरी, व्याख्यामला पुन्हा सुरू करून त्यांचे कार्य पुढे नेहण्याचा काँग्रेसचा निर्धार
देहूगाव : माजी शालेय शिक्षण मंत्री देहूगावचे सुपुत्र कै. रामकृष्ण मोरे यांची २२ वी पुण्यतिथी श्रीक्षेत्र देहूगाव येथे क्सक्स काँग्रेस पक्षच्या वतीने रविवार ( ता.२ ) रोजी सकाळी देहूगाव येथील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी साजरी केली.तसेच ८ नोव्हेंबर , कै प्रा. रामकृष्ण मोरे यांची जयंती साजरी करून याच दिवस पासून ,त्यांच्या नावे व्यख्यान माला सुरू करण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.कै. प्रधायपक रामकृष्ण मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कै प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी शालेय शिक्षण मंत्री असताना ,विध्यार्थ्यांच्या दाखल्यावर आईचे नाव टाकणे, पहिली पासून इंग्रजी सुरू केली त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना पहिली पासूनच इंग्लिश भाषा शिकता येऊ लागली.पूर्वी शाळेत ,कोणी मंत्री ,खासदार किंव्हा कोणी पाहुणे म्हणून मोठ्या हस्ती आल्या तर ,विधर्थ्यांना रणरणत्या उन्हात तासन तास बसवले जात होते.ते त्यांनी बंद केले.सांस्कृतिक विभागा मार्फत लोकनाट्य कलावंतांना मानधन सुरू करणे, नीती ते इंटरनेट आणि साक्षरता ते संघनक राजीव गांधी या नीतीचा महाराष्ट्रात उपयोग करून अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केली.असे अनेक निर्णय कै.प्रा.रामकृष्ण मोरे यांनी त्यावेळी घेतले.त्यांच्या आशा कार्याचा गौरव व्हावा ,त्यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोचवावेत ,यासाठी देहूगाव काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा कै.रामकृष्ण मोरे यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.बंद पडलेली व्यख्यान माला येत्या ८ नोव्हेंबर रोजी म्हणजे त्यांच्या जयंती दिनी पुन्हा व्याख्यान मला सुरू करून त्यांचे कार्य सर्वसामान्य जनते पोचवण्याचा निर्णय घेतला ,यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत ,त्यांचा कार्याचा अलेख उलगडला, आणि त्यांना आदरांजली अर्पण केली. * या प्रसंगी
गणेश मुसुडगे , मायाताई सातपुते ,
मधुकर कंद ,माऊली काळोखे
मधुकर मोरे ,नंदकुमार काळे,भाऊसाहेब कुंभार ,डॉ. विवेकानंद मोरे ,प्रकाश हगवणे
सुरेंद्र गोलांडे, महेश मोरे ,संदीप शिंदे
संदीप पवार ,सोमनाथ देशकर ,अशोक चव्हाण ,योगेश मोरे,शैलेंश चव्हाण ,सागर मुसुडगे , रोहित मोरे ,विक्रांत गोलांडे , विशाल गोलांडे ,मुकुंद परंडवाल ,वनिता देशकर ,राजेंद्र हगवणे, रशीद धोंडफोडे ,आदी मान्यवर उपस्थित होते.






