मधमाश्यांच्या हल्ल्यात नवलाख उंब्रे येथील माजी उपसरपंचाचा मृत्यू, अन्य तिघेजण जखमी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 06/05/2025 रोजी सकाळी 06/45 वाजण्याच्या सुमारास हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर सर्व राहणार नवलाख उंबरे ता. मावळ जि. पुणे हे नेहमीप्रमाणे गावाशेजारील डोंगरमधील तामकडा, नऊ लाख उंबरे येथे मॉर्निंग वॉकला गेले असता तेथे मधमाशांचे पोळ उठल्याने मधमाशांनी वर नमूद चौघांवर हल्ला केल्याने लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर व दत्ता नरवडे हे त्यामध्ये जखमी झाले असून त्यांचेवर पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे येथे उपचार चालू आहेत..

Advertisement

सदर मधमाशांचे हल्ल्यात श्री. हनुमंत बबूशा कोयते वय 44 हे बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचार कामी पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वी सकाळी 08/29 वा.मयत घोषित केले आहे…

सदर बाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो रणजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब जगदाळे, पो हवालदार 1368 श्री.जाधव व मपोहवा 3077 शेख असे करत आहेत.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page