कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची चौराई देवी डोंगर परिसरात हर्बेरियम संकलनासाठी शैक्षणिक क्षेत्रभेट
तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे (पुणे) येथे अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून दिनांक १३ व १४ जानेवारी रोजी चौराई देवी डोंगर परिसरात हर्बेरियम संकलनासाठी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या शैक्षणिक क्षेत्रभेटीत एकूण ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, त्यांच्यासोबत ४ प्राध्यापक सदस्य उपस्थित होते. ही क्षेत्रभेट प्रा. मुग्धा जोशी यांच्या यशस्वी आयोजन व मार्गदर्शनाखाली पार पडली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख, संकलन प्रक्रिया तसेच जतन करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने ही भेट अत्यंत उपयुक्त ठरली.
यावेळी प्रा. श्याम आवटे, प्रा. श्रद्धा सातकर, प्रा. विलासिनी पांडव यांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे विभागप्रमुख डॉ. जी. एस. शिंदे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, तसेच इंद्रायणी विद्या मंदिरच्या खजिनदार मा. निरूपा कानिटकर, सचिव मा. श्री. चंद्रकांत शेटे आणि अध्यक्ष मा. श्री. रामदास काकडे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा व प्रोत्साहन दिले.
ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक विकासासाठी निश्चितच दिशादर्शक ठरली असून, अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.






