कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे :
दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांत काकडे, अध्यक्ष श्री. संदीप काकडे,खजिनदार सौ. गौरी काकडे,शालेय मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत, पर्यवेक्षिका सौ. शुभांगी वनारे , पर्यवेक्षिका सौ. कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ ठेवण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला व खेळाचा मनमुराद आनंद लुटला या खेळाचे नियोजन सौ.अश्विनी काळे,सौ.अनुराधा वाघुले,सौ. सीमा देशमुख या शिक्षिकांनी केले होते. यानंतर संस्थेतर्फे औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. यामध्ये कु.अथर्व रहाटेकर,कु. आदित्य जाधव,कु. गणेश मयाप्पानवर, कु. अथर्व दगडे,कु. ऋषिकेश गंभीरे,कु.अर्चना चव्हाण,कु.अनघा दिसले, कु.श्रेया झावरे,कु.वसुंधरा जाधव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यातून शाळेबद्दल असणारे त्यांचे प्रेम, शिक्षकांविषयी असणारा आदर तसेच शाळेतीच्या दिवसातील आठवणींना उजाळा देत त्यांनी आपले भरभरून विचार व्यक्त केले. संस्थेचे, मुख्याध्यापिकांचे, सर्व सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले. आपल्या नर्सरी पासून ते दहावीपर्यंतच्या प्रवासाला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप काकडे, खजिनदार सौ.गौरी काकडे, मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यकाळात निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षकांनी दिलेला मोलाचा सल्ला आत्मसात करून भरीव कामगिरी करावी. खूप मोठे यश संपादन करून आपले स्वतःचे, शिक्षकांचे,शाळेचे,पालकांचे व देशाचे नाव उज्वल करावे अशी आशा व्यक्त करत पुढील शैक्षणिक कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शालेय सहशिक्षिका सौ. रुपाली जगताप यांनी मानले.