कै. पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ. कै. थोर साहित्यिक गो. नी. दांडेकर करंडक बालनाट्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन.
तळेगाव दाभाडे:
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे मावळ आयोजित कै. पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ कै. थोर साहित्यिक गो. नी. दांडेकर करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आलेले आहे. या स्पर्धा मावळ तालुकास्तरीय असून माध्यमिक व प्राथमिक गटात होणार असून रसिक प्रेक्षकांना अतिशय सुंदर बालनाट्य पाहायला मिळणार आहेत दोन्ही दिवस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पर्धा चालणार आहेत 12 तारखेला अतिशय भव्यदिव्य बक्षीस समारंभाचे आयोजन केलेले आहे. सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. तरी तळेगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.