कात्रजमध्ये खाजगी सावकारांचा धुमाकूळ… व्याजाच्या वसुलीसाठी रात्री 11 वा. सोसायटीत हत्यारबंद अवस्थेत वसुलीसाठी तगादा…. महिलेला मारहाण तर तरुणाला जबरी मारहाण.. पुणे पोलीस आयुक्तांचा धाक राहिला की नाही?
कात्रज पुणे:
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कात्रज कोंढवा रोड गोकुळ नगर येथील श्रीनिवास संकुल सोसायटी येथे काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता खाजगी सावकार विजय सोनावणे यांनी काही गुंडाना घेऊन सोसायटी मध्ये प्रवेश केला. मंगेश भगत हे राहत असलेल्या फ्लॅट क्रमांक 301 दुसरा मजला येथे हा सावकार पोहोचला. फ्लॅट जवळ गेल्यावर शिवीगाळ करून सोसायटीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत “मंगेश भगत कुठ आहे त्याला खल्लास करणार” अशी धमकी देऊन बंदूक दाखविण्यात आली. त्याच वेळी घरातील मुलांनी घाबरलेल्या अवस्थेत आपल्या काकांना घडलेल्या घटनेची फोन करून माहिती दिली. कात्रज कोंढवा रोडला उभे असलेले सागर म्हस्के हे तात्काळ घटनास्थळी गेले असता त्यांनी सर्व प्रकार पाहत खाजगी सावकार सोनावणे यांना सांगितले की आपण सोसायटीच्या खाली पार्किंग मध्ये जाऊन बोलूयात इथं मुलं खूप घाबरलेले आहेत, इथे शिवीगाळ करू नका त्यावेळेस खाजगी सावकार यांनी सागर मस्के यांना हातातील शस्त्राने जबरी मारहाण केली त्यामध्ये सागर मस्के गंभीर जखमी झाले आहेत. घडलेला प्रकार मंगेश भगत यांना फोन द्वारे समजताच त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगण्यात आली. रात्रभर पोलीस चौकी त न्यायासाठी बसलेल्या पोलिसांकडून मात्र किरकोळ स्वरूपाचा गुन्हा होईल अशी माहिती मिळाली. करून पुन्हा तो खाजगी सावकार अशा कित्येक लोकांना धमकावत राहील याची जराशी सुधा काळजी पोलिसांनी घेतल्याच दिसत नाही. वैतागलेल्या पीडित कुटुंबांनी शेवटी पहाटे पाच वाजता रडत रडत आपल्या घराकडे धाव घेतली. अन्यायाविरोधात सावकार वर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली जाईल अशी अपेक्षा असताना मात्र खाजगी सावकार पोलीस ठाण्यात खुर्चीवर बसून मैनेज केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पुण्यातील गुंडांची दिवसाढवळ्या पोलीस आयुक्तांनी काढलेली धिंड आणि या खाजगी सावकाराला पोलीस प्रशासनाने दिलेले बळ यामध्ये मात्र विरोधाभास असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
चौकट
खाजगी सावकार व गुंडाची धिंड काढण्याची स्थानिक नागरिकांची मागणी…
दहशत निर्माण करणार्या गुंडाना धडा शिकवणे आवश्यक तरच कायद्याचा धाक राहणार.
रात्री 11 वा. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करणार्या खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळणे गरजेचे अन्यथा कात्रज कोंढवा या भागात गुन्हेगारी वाढणार.






