जन आरोग्य योजना लाभार्थींनी मोफत आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत
तळेगाव दाभाडे:
राज्यातील जनतेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना.व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे येथील ढाकणे हॉस्पिटलच्या आरोग्य मित्र स्वाती शिंदे यांनी केले आहे. या संदर्भात बोलताना स्वाती शिंदे म्हणाल्या की या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारावर ३४ विशेष श्रेणीत उपचारा असून त्यामध्ये १०३८ उपचार पद्धती या खाजगीत व शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत तसेच १७१ उपचार पद्धती फक्त शासकीय रुग्णालयात आहेत या योजनेचा लाभ तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तळेगावातील ढाकणे हॉस्पिटल. तळेगाव जनरल हॉस्पिटल. पवना हॉस्पिटल. पायनर हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी आपली केवायसी करून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे हे कार्ड तुम्हाला ५लाख रुपयापर्यंतचे मोफत आरोग्य उपचार मिळवून देते. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड. शिधापत्रिका( रेशन कार्ड) ओळखपत्र( जसे की पॅन कार्ड. मतदान ओळखपत्र. ड्रायव्हिंग लायसन) संपर्क क्रमांक. पूर्ण पत्ता. अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी तुम्ही आयुष्यमान भारत हेल्पलाइन क्रमांक१४५५५ वर आणि ढाकणे हॉस्पिटलच्या स्वाती शिंदे ८०९७५४१९५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.






