*जैन इंग्लिश स्कूलचे सलग पंधराव्या वर्षी दहावीच्या निकालाचे नेत्रदीपक यश*
तळेगाव दाभाडे :
शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत जैन इंग्लिश स्कूलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे मार्कांचा षटकार मारून
विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले
यावर्षी शाळेचे एकूण 96 परीक्षार्थी परीक्षेत बसले होते सर्वच विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले असून यामध्ये 90 टक्के पेक्षा जास्त. मार्क्स मिळवणारे एकूण 23 विद्यार्थी तर..46. विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून यश संपादित केले
शाळेची विद्यार्थिनी अंजली विशाल भोर ही 97.80% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर कुमारी वैष्णवी संतोष गवळी हिने 97.40 टक्के मिळवून द्वितीय क्रमांकाची बाजी मारली.
कुमारी प्राप्ती संतोष हाडवळे या विद्यार्थिनीने 96 %टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे चतुर्थ क्रमांक पटकावणारा विद्यार्थी शौर्य पंढरीनाथ घुले याने 95.40% गुण प्राप्त करून यश संपादित केले ईश्वरी महादेव खापे आणि तुषार संजय शिंदे या विद्यार्थ्यांनी 95.20% प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना मिळालेले यश ही त्यांच्या उत्कृष्ट निकालाची पावती आहे असे प्रतिपादन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने 90% पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा उच्चांक या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णत्वाकडे नेला याचे विशेष कौतुक करण्यात आले.
शाळेचे चेअरमन सर्व संचालक सदस्य मुख्याध्यापिका शुभांगी भोईर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.