श्री गणेश तरुण मंडळाचा ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ वाहतूक पोलीस अंमलदार ज्योती सोनवणे यांना प्रदान
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश तरुण मंडळ, गणपती चौक या मानाच्या पाचव्या गणपतीतर्फे आयोजित कार्यक्रमात यंदाचा ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ वाहतूक पोलीस अंमलदार ज्योती सोनवणे यांना प्रदान करण्यात आला.
हा सोहळा सुशीला मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा डॉ. सौ. राधिका हेरेकर होत्या.
या प्रसंगी सौ. हेमा ताई खोल्लम, श्री दत्तात्रय मेढी, उद्योजक श्री राजू शेठ शिंदे, पू. ना. गाडगीळ अँड सन्स चे मॅनेजर श्री प्रदीप कदम, सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप डोळस, तसेच पुरस्कार्थी ज्योती सोनवणे यांचे वडील भिकाजी सदावर्ते उपस्थित होते.
123 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक मंडळाच्या वतीने हा पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून दिला जात असून यावर्षी तिसऱ्या वर्षात प्रवेश केला आहे.






