*तळेगाव दाभाडे येथे बिजनिमित्त अभंगवाणी सोहळा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे शाळा चौकातील प्राचीन काळातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात संस्थानच्या वतीने श्री तुकाराम महाराज बिज सोहळ्याचे निमित्ताने भजन,हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी(दि.१६)पहाटे श्रींची काकड आरती व महापूजा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे आणि रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी अभंगवाणी सोहळा संपन्न झाला यावेळी स्वरदा रामतिर्थकर,तेजश जोशी,संपदा थिटे यांनी मधूरवाणीने गायन केले त्यांना वादनाची साथ प्रदीप जोशी,मंगेश राजहंश,मंदार परगी,गोरख कोकाटे,योगीराज राजहंस यांनी दिली.यावेळी तळेगावकर भाविक भक्ती रसाने चिंब झाले होते. सायंकाळी महाआरती करण्यात आली.यावेळी डॉ.अनंत परांजपे, सोनबा गोपाळे,मिलिंद शेलार,पांडुरंग पोटे,विन्सेंट सालेर,दशरथ जांभूळकर,भारत काळे सुनंदा जोशी निशा अभ्यंगकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.विनया केसकर यांनी केले.सोहळा यशस्वी करण्यासाठी यतीन शहा,प्रशांत दाभाडे,शामराव भेगडे,शेखर गुंड,अतुल देशपांडे यांनी परिश्रम घेतले. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन संतोष खांडगे परिवारांकडून करण्यात आले होते.