बालविकास विद्यालयाचा SSC (10वी) च्या 100 टक्के, निकालाची परंपरा कायम
तळेगाव दाभाडे.
स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात यंदाही 100 टक्के यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाची
1) देशमुख श्रेया वैभव – 98.20 %(प्रथम) आली आहे , तर विद्यालयात अनुक्रमे
2) जांभुळकर श्रेयस गोरक्ष – 97.60 % (द्वितीय)
3) पाटील आर्या संदीप – 96.60%( तृतीय).
विद्यालयात यंदा एकूण 149 विद्यार्थी परीक्षेत बसले त्यापैकी 83 विद्यार्थी हे उच्चप्रथम श्रेणी,53 विद्यार्थी हे प्रथम श्रेणी तर 13 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील यंदा 21 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त तर करून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शेटे सचिव श्री. किशोर राजस ,सभासद श्री . सुरेश भाऊ चौधरी, श्री. सुभाष खळदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे, यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले.