आळंदीत नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स धर्मादाय ट्रस्ट व मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन यांचे वतीने एक कोटी पन्नास हजार रुपये खर्चाची इमारत आळंदीत उभारणार विस्तारित इमारतीचे उत्साहात भूमिपूजन आमदार बाबाजी काळे,श्रीकांत भारतीय यांचे हस्ते भूमिपूजन

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) :

नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स च्यारिटी ट्रस्ट व मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन यांचे वतीने तीर्थक्षेत्र आळंदी येथे मुंबई डबेवाला धर्मशाळेचे भूमिपूजन मुंबईचे आमदार श्रीकांत भारतीय व खेड तालुक्याचे आमदार बाबाजीशेठ काळे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. एक कोटी पन्नास हजार रुपये खर्चाची नवीन तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. वारकरी परंपरा व सेवा भाव जपत आळंदी येथे धर्म शाळा उभारणेचा उपक्रम संघटनेने हाती घेतला असून या माध्यमातून वारकरी भाविक व चाकरमान्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख ,आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे , माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, अॅड. अमृता गुरव, प्रिया पवार , संघटनेचे खजिनदार बारकू फापाळे, रामदास करवंदे, दिंडी मालक माधव रणपिसे , भिमाशंकर सेवा मंडळाचे अध्यक्ष गिरजूशेठ चांभारे,औंढेचे सरपंच प्रदीप शिंदे, वाजवणेचे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे आदी व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

मुंबई डबेवाला संघटनेची स्थापना वाजवणे गावचे कै. महादू आवजी बच्चे यांनी सन १८८८ साली केली. संघटनेचे पहिले अध्यक्ष औदर गावचे कै. धोंडीभाऊ रामभाऊ मेदगे यांनी कामकाज पाहिले.गडद गावचे कै. गंगाराम तळेकर, रघुनाथ मेदगे, सबाजी मेदगे यांनी ही संघटना वाढविली. १३६ वर्षाची ही संघटना असून राज्यातील सहा तालुक्यातील २५०० सभासद आहेत. पंढरपूर, जेजुरी, आळंदी व भीमाशंकर या ठिकाणी संघटनेची जागा व धर्मशाळा इमारती आहेत. संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडून डबे वाल्यांकरिता डबेवाले भवन, ५००० फ्लॅट ची घरे ,कोरोना काळात अन्नधान्य, कपडे, सायकली ,मोबाईल, टॅब इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच २०८ बाईक डबेवाल्यांना वाटप करण्यात आल्या आहेत. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली. प्रास्ताविक संघटनेचे माजी अध्यक्ष सोपान मरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गवांदे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सबाजी मेदगे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page