*अॕड्. पु. वा.परांजपे विद्या मंदिरात अपूर्व विज्ञान मेळावा व पालक सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला*
तळेगाव दाभाडे :
ॲड.परांजपे विद्या मंदिराचे 1977 बॅचचे माजी विद्यार्थी श्री. सुदाम दाभाडे* *यांच्या शुभहस्ते थोर शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन, भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम, सी व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले* . विद्यालयातील इयत्ता *पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयाचे एकूण शंभर प्रकल्प तयार केले होते* .अपूर्व विज्ञान मेळाव्याचे औचित्य साधत *विज्ञान विषयाला अनुसरून कलात्मक रांगोळी दालन, सेल्फी पॉईंट* तयार करण्यात आले होते.या प्रसंगी श्री *. सुदाम दाभाडे,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष श्री.मिलिंद शेलार, ओमकार वर्तले, अंकुश गुंड,गणेश लोंढे व पालक मोठया संख्येने अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी उपस्थित होते* .*प्रशालेचे कार्यकुशल मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर* यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेतील भौतिक सोयी सुविधा, शालेय शिस्त, विद्यार्थ्यांची शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कुस्ती स्पर्धेतील ईश्वरी झिंजुरके व अस्मी लोणारे यांनी केलेली दैदिप्यमान प्रगती , डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड च्या माध्यमातून झालेला कायापालट अपूर्व विज्ञान मेळावा आयोजनामागील हेतू स्पष्ट केला
. उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांनी बालचमूंनी तयार केलेल्या प्रकल्पांची व रांगोळी दालनाची पाहणी करून कौतुकाची व शाबासकीची थाप दिली *. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संजय तथा बाळा भेगडे साहेब ,उपाध्यक्ष माननीय श्री गणेश खांडगे साहेब, सचिव माननीय श्री संतोष खांडगे साहेब, खजिनदार माननीय श्री राजेश म्हस्के साहेब ,सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार शेलार साहेब व सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले* .प्रमुख पाहुणे श्री. सुदाम दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेचा झालेला कायापालट त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीला वाव देऊन भविष्यकाळात वैज्ञानिक व भारताचे सजग नागरिक तयार होण्यासाठी गुरुजनांची मार्गदर्शकाची भूमिका स्पष्ट केली . *विज्ञान हा केवळ विषय नसून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे* हे लक्षात घेत नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले . *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा काळडोके** यांनी तर *आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम* यांनी केले. *अपूर्व विज्ञान मेळावा यशस्वी करण्यासाठी नाजुका सोनकांबळे, विजय मुळे, सुवर्णा काळडोके , रजनी बधाले,प्रिया कांबळे,कविता पाखरे,गायञी जगताप, सुषमा दाते ,सुजाता कातोरे , प्रभा काळे,आशा आवटे, सारिका धुमाळ, स्वाती तांबिरे, रुपाली सरोदे,कोमल कांबळे,संपत गोडे,संजय खराडे, प्रयोगशाळा परिचारक संतोष घरदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले* . अपूर्व विज्ञान मेळावा व पालक सभा *कार्यक्रम मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर व पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली* अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहाने पार पडला. *कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.*