तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने दहावी – बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांचा सन्मान
तळेगाव दाभाडे दि. ३१
तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या सभासदांच्या पाल्यांचा जे दहावी -बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.३०) मयुरेश डायनिंग हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते
शार्दुला सुरेश शिंदे हिचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे होते.
शार्दुला शिंदे हिने आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे या शाळेतून इयत्ता दहावीमध्ये ७९.४० टक्के गुण मिळून यश संपादन केले.
यावेळी शार्दुलाचे आई-वडील सुरेश शिंदे व शुभांगीनी शिंदे तसेच भाऊ सृजल शिंदे,मावशी दिपाली सिंग हे सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस फाउंडेशनचे सचिव डॉ. संदीप गाडेकर यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले.
या सत्कार सोहळ्यात प्रकल्प प्रमुख अमीन खान, अध्यक्ष विलास भेगडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना शार्दुला शिंदे प्रेस फाउंडेशनचे आभार मानले तसेच वडील सुरेश शिंदे यांनी देखील प्रेस फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, खजिनदार अंकुश दाभाडे, महेश भागीवंत, अमित भागीवंत, संतोष थिटे, मयूर सातपुते आदी सदस्य उपस्थित होते. केदार शिरसट यांनी आभार मानले.






