सासवड पोलीस ठाण्यात बहुजन हक्क परिषदेचे निवेदन बेकायदेशीर हुक्का पार्लर तात्काळ बंद करण्याची मागणी

SHARE NOW

सासवड (प्रतिनिधी )

सासवड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावेत, अशी ठोस मागणी बहुजन हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, शहरात काही ठिकाणी परवानगीशिवाय हुक्का पार्लर सुरू असून येथे अल्पवयीन मुले व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर ये-जा करत आहेत. त्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हुक्का पार्लरमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असून गोरगरीब पालकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

Advertisement

 

यामुळे संबंधित सर्व हुक्का पार्लरवर तातडीने छापे टाकून सखोल तपासणी करावी व बेकायदेशीररित्या चालविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल सचिव कैलास धिवार सोशल मीडिया अध्यक्ष अजीम आतार आदी उपस्थित होते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page