राजस्थानचे राज्यपाल यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान; डॉ. विशाल सतीश वाळुंज यांचा गौरव

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या हस्ते डॉ. विशाल सतीश वाळुंज यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि ज्ञानवृद्धीतील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून प्रदान करण्यात आला.

 

या विशेष प्रसंगी राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी संशोधन क्षेत्रातील नवकल्पना, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजोपयोगी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी युवा संशोधकांना ज्ञाननिर्मिती आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

संशोधन आणि विकास (Research & Development – R&D) हे देशाच्या प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, उच्च शिक्षण संस्थांमध्ये होत असलेले दर्जेदार संशोधन हे केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित नसून उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उपाय निर्माण करण्यास मदत करते. विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी करावा, तसेच नवसंशोधन, उद्योजकता आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणारे संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संशोधनातून निर्माण होणारे ज्ञान आणि तंत्रज्ञान भारताला आत्मनिर्भर, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

 

 

डॉ. विशाल सतीश वाळुंज यांचे मावळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशामुळे संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे असे त्यांनी नमूद केले.

 

डॉ. वाळुंज यांनी आपल्या संशोधन कार्याद्वारे संबंधित विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या बरोबर विशेष 11 जणांचे सन्मान व विद्यापीठातील गोल्ड मेडलिस्ट चार विद्यार्थ्यांचे सन्मान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. वाळुंज हे तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राहिलेले आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. डॉ. वाळुंज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यूनिवर्सिटी पनवेल येथून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातून पीएचडी प्रदान करण्यात आली. व्हेरिफाय डी डुप्लिकेशन युजिंग ब्लॉक चेन ऑन डेटा विथ स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टेक्निक फोर डिटेक्टींग एरर ऑन क्लाउड या विषयावर विद्यापीठात त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता.

 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी जुलै २०२४ पासून राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारली असून ते शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावृद्धीवर विशेष भर देत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page