स्पीड ब्रेकर गेले: आता सुरक्षा रेषां ची हाक,तळेगावातील जिजामाता चौक ते स्टेशन चौक मार्गावर सफेद सुरक्षा रेषाची मागणी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : शहरातील जिजामाता चौक ते स्टेशन चौक हा अतिवर्दळीचा मार्ग सध्या नव्या कारणाने चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमबाह्य स्पीड ब्रेकर हटविण्याची मोहीम प्रशासनाने राबवल्यानंतर या मार्गावरील अनेक स्पीड ब्रेकर हटविण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आता पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांकडून झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या सुरक्षा रेषा तातडीने रंगविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

शहरातील हा मार्ग संवेदनशील मानला जातो. परिसरात शाळा, श्री शिव शंभू स्मारक, नगरपालिका कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, रुग्णालये तसेच व्यापारी दुकानाची

मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सकाळच्या वेळेत विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Advertisement

 

स्पीड ब्रेकर हटवल्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांचा वेग वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक गडद झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद कार्यालय, ख्रिश्चन स्मशानभूमी, गणेश कॉलनी, खांडगे पेट्रोल पंप, खांडगे स्मारक तसेच बीएसएनएल कार्यालयासमोर वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे तातडीने रंगवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

स्पीड ब्रेकर हटविणे आवश्यक होते; मात्र त्यासोबत पर्यायी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेत त्वरित रस्ते सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page