फ्रेड्स ऑफ नेचर असोसिएशनचा२६ वा वर्धापन दिन दिमाखात संपन्न….
तळेगाव दाभाडे :
फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचा र २६ वा वर्धापन दिन व रौप्यमहोत्सवी समारंभ उत्साहात संपन्न झाला.
“रेस्क्यू” या प्राण्यांचे बचाव कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक श्री किरण रहाळकर हे प्रमुख पाहुणे होते, व त्यानी वाघ, बिबटे, पक्षी, देवमासा वाचवतानाचा थरारक अनुभव फोटो व व्हिडिओ द्वारे ऊपस्थिताना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निखील भगत यानी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छां दिल्या. संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यानी प्रास्ताविक करताना संस्थेच्या २५ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष डाॅक्टर गणेश सोरटे यानी संस्थेचे कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्या योगदाना बद्दल आभार मानले.
संस्थेने या वर्षी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला. त्या मध्ये,
नेहा पंचमीया, संस्थापक अध्यक्ष ‘RESQ’ C.T., महासीर मॅन श्री. शशांक ओगले, एव्हरेस्ट वीर श्री. राजेश पठाडे, बांबू तज्ञ श्री. हेमंत बेडेकर, ऊत्तम नगरसेवक श्री. निखिल भगत, अनाथ बालकांसाठी झटणारी संस्था ‘संपर्क बालग्राम’ चे प्रमुख श्री अमीतकुमार बॅनर्जी, त.दा.न.पा चे माजी वृक्षाधिकारी श्री सिद्धेश्वर महाजन,
सातत्त्याने निसर्ग पुरक ऊपक्रम राबविणारे रामभाऊ परुळेकर विद्या मंदिर, ऊत्तम नर्सरी मालक श्री. नरेंद्र फुलसुंगे, कॅक्टस व ऑर्किड्स चे संकलक श्री. अजित गोखले यांना आपापल्या क्षेत्रातील ऊल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानीत करून पुरस्कार देण्यात आला.
गेल्या २५ वर्षांतील सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
या वर्षी संस्थेने इंनडोअ र व आऊटडोअ र शोभिवंत झाडांचे प्रदर्शन दि.२४ व २५ मे रोजी भरविले होते. त्याला तळेगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
वृक्ष प्रदर्शना साठी
डायमंड नर्सरी सोमाटणे, व प्लॅन्ट पॅराडाईज नर्सरी, परवंदवडी यानी मोलाचे सहकार्य केले. सुनील गोडसे यानी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचीव सुधाकर मोरे, खजिनदार श्री सावंत, विश्वास देशपांडे, संजय साखळे, प्रकाश पंडित, ज्योती गोखले, अमीत पोतदार, सुपर्णा गायकवाड, तनया महाजन, पूजा डोळस, मीरा रामायणे, विवेक रामायणे या फोना टीमने सहकार्य केले.