*श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा वर्धापन दिन संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील निळकंठ नगर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी प्रबोधन केले.हभप नितीन महाराज काकडे यांनी श्री विठ्ठल कथा सांगितली.यावेळी डॉ.अनंत परांजपे,माजी तहशीलदार रामभाऊ माने,किरण परळीकर दीपक फल्ले,श्रीराम कुबेर,किरण ओसवाल,विनायक अभ्यंकर,अशोक बकरे,अशोक कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.सुमारे चारशे भाविकांना श्री विठ्ठल रुक्माईची प्रतिमा देण्यात आली.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.परिसरातील भाविकांनी त्याचा लाभ घेतला. मंदिर समितीचे पदाधिकारी,सदस्य,रेणुका महिला भजनी मंडळ यांच्या सहकार्याने सोहळा पार पडला.