आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर, सेवाभावी सेवकांचे कचरा संकलन उत्साहात

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) :आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवा भावी संस्थानी पुढाकार घेतला आहे. या अभियानात नाणिज येथील मठातील सद्गुरू नरेंद्र महाराज यांचे भक्त, शिष्य परिवार आणि संप्रदायाचे विशेष पुढाकाराने तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदी कचरा मुक्त करण्यासाठी लक्षवेधी भव्य दिव्य स्वच्छता अभियान उत्साही सेवाभाव जपत राबविण्यात आहे. या अभियानात विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन भक्तांनी सेवेचे माध्यमातून सेवेचे कार्यास मोठा हातभार लावला. शेकडो भक्तांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत सेवा कार्य रुजू केले. समाधानकारक सेवा रुजू करण्याचे भाग्य अधिक मास धार्मिक पर्वणीत लाभल्याचे सांगत सेवेतून समाधान आणि आनंद मिळाल्याचे विश्वभर शिंदे सेवकांनी सांगितले. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वाद आणि मार्गदर्शक प्रेरणेतून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. यावेळी माऊलींचे प्रतिमेचे तसेच नदी पूजन झाले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेची पूजा करीत चे पूजन तसेच स्वच्छता मोहिमेस सुरुवात झालीं. या अभियान मध्ये राज्यातील विविध भागातून साधक, सेवक, शिष्य गण उपस्थित होते. पवित्र इंद्रायणी नदीचे

Advertisement

या अभियानासाठी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून चार हजारांहून अधिक भाविक व संग्राम सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचाही लक्षणीय सहभाग या मोहिमेत पाहायला मिळाला. या वेळी नदी पात्रातून कचरा, कपडे, जलपर्णी, लाकडी वस्तू, महापुराचे पाण्यात वाहून आलेले झाडे,झुडुपे, काचा, निर्माल्यादी वस्तू, अस्थी विसर्जन समवेत सोडलेल्या वस्तूं नदी पात्रा बाहेर काढण्यात आल्या. या वेळी साधकांनी थेट कचरा आळंदी नगरपरिषदेला पुढील विल्हेवाटीला देण्यात आला. लक्षवेधी स्वच्छता मोहिमेने आळंदी नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या कामात प्रभावी सेवेच्या कार्याने एकप्रकारे अंजन घातले. महापौर रवी लांडगे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कामेटीचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदी मान्यवर यांनी सेवेच्या कार्याचे कौतुक करून सेवा रुजू करीत इतराना प्रेरणादायी उपक्रम यशस्वी पणे राबविला. , या वेळी सेवा कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेने आरोग्य विभागातील यांत्रिक साधने या वेळी उपलब्ध करून देत स्वच्छता मोहिमेत स्वतःचे योगदान दिले. अखिल भारतीय संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, सिद्धेश्वर कोळी, लेफ्टनंट जनरल पश्चिम महाराष्ट्र गणेश सस्ते आदीनी सेवा कार्य रुजू होण्यास विशेष परिश्रम घेतले. आळंदी जनहित फाऊंडेशनचे वतीने या सेवेच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. संध्याकाळी इंद्रायणी नदी घाटावरून इंद्रायणीत दिपदान करण्यात आले. यावेळी नदी परिसर दीपोत्सवात उजळून निघाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page