लायन्स क्लब ऑफ तळेगांव आयोजित “लायन्स मावळ श्री शरीर सौष्ठव स्पर्धा २०२६” उत्साहात संपन्न

SHARE NOW

*तळेगांव दाभाडे,

दि. २३/०५/२०२६: लायन्स क्लब ऑफ तळेगांव यांच्या वतीने शनिवार दि. २३/०५/२०२६ रोजी सायं. ६:३० वाजता लायन डॉ. भंडारी खुला रंगमंच, कडोलकर कॉलनी येथे “लायन्स मावळ श्री शरीर सौष्ठव स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटक मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सुनिल (आण्णा) शंकरराव शेळके होते.

नगरसेवक श्री. सुदामभाऊ शंकरराव शेळके व श्री चिराग खांडगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

 

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन चेअरमन लायन डॉ. अनिकेत काळोखे व को-चेअरमन लायन आर्किटेक्ट मयूर राजगुरव तसेच समन्वयक श्री. मनोज फुलसुंगे यांनी केले. लायन ॲड. नंदकुमार काळोखे व पीडीजी लायन डॉ. दिपक शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले. लायन्स हेल्थ क्लब चेअरमन लायन चंद्रकांत थिटे यांचे देखील विशेष सहकार्य मिळाले.

Advertisement

 

यावेळी लायन मनोहर दाभाडे, लायन शाळेग्राम भंडारी, लायन महेश शहा, लायन भरत पोद्दार, लायन सुनील वाळुंज, लायन नंदकुमार हारगापुरे, लायन अनिल तानकर व इतर मान्यवर लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन दिनेश कुलकर्णी यांनी केले. अध्यक्ष लायन राजेंद्र झोरे यांनी सर्वांचे स्वागत केले हा कार्यक्रम घेण्या मागचे उद्दिष्ट व मनोगत लायन नंदकुमार काळोखे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता को-चेअरमन लायन मयूर राजगुरव यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

 

*प्रमुख आकर्षण* असलेले पोजर – मिस्टर इंडिया कमलेश आत्रा यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. तळेगांव परिसरातील अनेक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page