औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शारदा होंदुले यांचा सत्कार

SHARE NOW

मावळ :

शासकीय तंत्रनिकेतन , सोलापूर यांच्या वतीने सयाजी हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अपर संचालक मा. शारदा होंदुले यांचा सत्कार आणि पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शासकीय तंत्र निकेतन सोलापूरचे प्राचार्य डॉ. नरोटे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरविंद देशपांडे, प्रा. कदम, प्रा. सय्यद, उद्योगपती श्री. नंदकुमार शेलार , तंत्रनिकेतन चे माजी विद्यार्थी , राजेंद्र पवार , विलास बाबर , लतीफ सय्यद , रवींद्र चव्हाण उद्योजक शशिकांत हळदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना दादासाहेब उ-हे यांनी मांडली. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शारदा होंदुले यांच्या कार्याचा गौरव केला. औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक उद्योगांमध्ये सुरक्षितता आणि शिस्त निर्माण होण्यास मदत झाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

Advertisement

सत्कार समारंभात शारदा होंदुले यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा, बी.ई. तसेच अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदोन्नती मिळवत पुणे प्रशासकीय विभागाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

गंभीर औद्योगिक अपघातांची चौकशी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे औद्योगिक क्षेत्र अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनण्यास त्यांच्या कार्याचा मोठा हातभार लागल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना शारदा होंदुले यांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद देशपांडे यांनीही आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.तसेच माजी विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन मधे जाऊन मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. मनोज गायकवाड यांनी केले. प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page