जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समाज भुषण पुरस्कार वितरण.

SHARE NOW

वाकड:- वाकड येथील जेतव विहार येथे झालेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिवव्याख्याते व जेष्ठ पत्रकार अनिल वडघुले यांना समाजभूषण पुरस्कार२०२६, क्रिकेट पंच समालोचक,दत्ता सुर्यवंशी यांना निर्भिड पत्रकारिता तर संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सतिश काळे यांना सामाजिक , जेतवन धम्म भुषण पुरस्कार २०२६ महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा या राज्यात प्रभावीपणे बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करणारे आयु. प्रबुद्ध साठे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Advertisement

जेतवन ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर, महनीय व्यक्तीनां कार्याची दखल घेऊन सन्मानित केले जाते.सदर कार्यक्रमा साठी परिसरातील नगरसेविका सौ नेहा कलाटे,आरती चोंधे, विनायक गायकवाड,कुणाल ओव्हाळकर , शालिनी गुजर आदींनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.यावेळी अनिल वडघुले यानी सत्काराला उत्तर देताना सांगितले की हल्लीच्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचा प्रभावीपणे प्रसार करायला हवा.समता , सद्भावना,आचार विचार याचा बारकाईने अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार प्रत्येकाच्या र्हुदयात बिंबवले पाहिजेत.नुसत्या जयंत्या साजरा करत महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचू नका तर त्यांना डोक्यात घ्या तर बदल घडेल असे सांगितले.तर नगरसेवक कुणाल ओव्हाळकर म्हणाले की जेतवन ट्रस्टच्या वतीने दरवर्षी उत्तम उपक्रम राबविले जातात. या मैदानावर भव्यदिव्य अशी सर्व सोयींनी सुसज्ज अशी पार्किंग,खेळाचे मैदान व ईतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी आयु प्रबुद्ध साठे यांचा “चलो बुध्द की ओर” प्रबोधन गितांचा कार्यक्रम सादर झाला. या साठी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.जेतवन ट्रस्टचे अध्यक्ष बी जी सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.श्री निलेश खोब्रागडे यांनी सुत्र संचालन केले, आभार जेतवन उत्सव समिती अध्यक्ष विजय खरात यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाम सोनवणे, आनंद जाधव, दिपक कांबळे, तुषार भिंगे, संजय वाघमारे, अरविंद गायकवाड, अनिल साळवी, संतोष जाधव,राज घनघाव, सचिन गाडे, हरिभाऊ राऊत, सचिन साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page