कै. राजीव गांधी माध्यमिक विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९२.१०%; मुलांनी मारली बाजी!

SHARE NOW

पुणे/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, सलगरा बु. द्वारा संचलित कै. राजीव गांधी माध्यमिक विद्यामंदिर सलगरा बु. शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. मार्च २०२६ मध्ये शाळेचा एकूण निकाल ९२.१०% लागला असून, यंदाच्या निकालात मुलांनी विशेष वर्चस्व गाजवत बाजी मारली आहे.

 

इयत्ता १० मधील अनेक विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून ‘डिस्टिंक्शन’मध्ये यश संपादन केले आहे.

यंदा शाळेतील मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आणि मिळालेले उच्चांकी गुण मुलींच्या तुलनेत सरस ठरले आहेत.

 

शाळेतील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

 

प्रथम: चि. शिंदे अच्युत दत्तप्रसाद ९०.८०%

द्वितीय: चि. साळुंखे गौरव विक्रम ८३.४०%

Advertisement

तृतीय: कु. शिंदे जान्हवी बालाजी ७७.००%

चतुर्थ: चि. सय्यद आयान सलीम ७५.८०%

पंचम: चि. शिंदे किरण राजकुमार ७५.८०%

निकाल जाहीर होताच शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

“हा निकाल आमच्या शिक्षकांचे कष्ट आणि मुलांच्या जिद्दीचे फळ आहे. विशेषतः मुलांनी यंदा घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील या मुलांनी विपरीत परिस्थितीतही अभ्यासात सातत्य राखले,” तरी ८ ते १०वी प्रवेश देणे चालू असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुडे सर यांनी व्यक्त केले.

संस्था पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी आणि पालकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page