सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा SSC बोर्ड परीक्षेत १००% निकाल
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाने एस. एस.सी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये उज्ज्वल यश संपादन करत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे, मुख्याध्यापिका रंजिता थंपी व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि पालकांच्या सहकार्यामुळे शाळेने उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.
यावर्षीच्या SSC बोर्ड परीक्षेत जामदार दिशा अंकुश हिने ९३.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मानवर प्रणिशा दिनेश हिने ९३.२०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच बागुल सार्थक सचिन याने ९२.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. सोनार ऋतुजा नरेंद्र हिने ९१.२०% गुणांसह चौथा क्रमांक तर रात्रे संदीप श्रवणकुमार याने ९०.८०% गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त केला.
विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात जामदार दिशा अंकुश हिने ९२ गुण मिळवले. हिंदी विषयातही जामदार दिशा अंकुश हिने ९१ गुण प्राप्त केले. मराठी विषयात पाटील साक्षी सचिन हिने ९५ गुण मिळवले. गणित विषयात बागुल सार्थक सचिन याने ९९ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविले. विज्ञान विषयात रात्रे संदीप श्रवणकुमार याने ९८ गुण मिळवले तर समाजशास्त्र विषयात बागुल सार्थक सचिन याने ९७ गुण प्राप्त केले.
शाळेच्या एकूण निकालात ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ५ विद्यार्थी आहेत. ७५% व त्यापेक्षा अधिक गुणांसह २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ६०% ते ७५% दरम्यान गुण मिळवणारे ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे शाळेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे व सचिव दत्तात्रय नाटक व आदि मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले . विद्यालयाच्या प्रगतीचा हा अभिमानास्पद क्षण असून भविष्यातही विद्यार्थी असेच यश संपादन करतील, असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांनी व्यक्त केला.






