तळेगाव दाभाडे येथील पुरातन श्री गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त मोगरा महोत्सव

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

तळेगाव दाभाडे येथील गणपती चौकातील पुरातन श्री गणपती मंदिरात वैशाख कृ चतुर्थी दि ०५ मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पहाटे ६ वा. श्रींची महापूजा व महाआरती संपन्न झाली. स. ९ वा. अंगारक चतुर्थी निमित्त श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व गणेशभक्तांना उत्तम आरोग्य व सुख शांती लाभो हा संकल्प श्रींच्या चरणी समर्पित केला. ऐतिहासिक तळेगाव दाभाडे नगरीतील अतिशय जुने मंदिर असल्याने व अनेकांचे मनोरथ पूर्ण करणारा सिध्दीविनायक अशी भाविकांची श्रध्दा असल्याने श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांनी पहाटेपासून गर्दी केली होती. एका गणेशभक्ताच्या वतीने श्रींच्या चरणी ५२१ केळ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.सुगंधित पुष्पांच्या सजावटीने मंदिर परिसर सुवासिक झाला होता.रात्री महाशेजारती संपन्न होऊन उत्सवाची सांगता झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page