वेगाला नवी दिशा, प्रवासाला नवा श्वास! मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे भव्य लोकार्पण

SHARE NOW

लोणावळा :

राज्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणारा आणि प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत करणारा मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज मोठ्या उत्साहात लोकार्पित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भरत गोगावले, आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, तसेच खासदार सुनील तटकरे आणि श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. घाटमाथ्यातील अवघड वळणे आणि वाहतुकीतील अडथळे कमी करून हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना ठरणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल.

राज्याच्या विकासाला गती देणारा हा प्रकल्प केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहे.

वेग, विश्वास आणि विकास यांचा संगम असलेला हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा टप्पा


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page