देहूत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

देहू :

देहू नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार, दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भक्ती निवासाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरोधात कीर्तनातून प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेडगाव येथे झाला. त्यांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

Advertisement

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात नगराध्यक्ष पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष प्रियंका मोरे, माजी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, नगरसेविका सपना मोरे, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका कदम, आरोग्य विभाग प्रमुख कविता पाटील, शहर समन्वयक सारिका सांगळे आदींच्या हस्ते नगरपंचायतीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच ड्रेनेजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करत देहूत संत गाडगेबाबा जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page