उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाताने आळंदी पंचक्रोशीत शोककळा आळंदीत व्यावसायिक दुकाने बंद ; साश्रू नयनाने भावपूर्ण श्रद्धांजली 

SHARE NOW

आळंदी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान झालेल्या अपघात झाला. यात दादांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू बुधवारी ( दि. २८ ) झाला. या घटनेने संपूर्ण राज्यासह आळंदी पंचक्रोशीत शोककळा पसरली. आळंदी शहरात माऊली मंदिर परिसरातील प्रसाद, फुल विक्रेते, दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या आस्थापना बंद ठेवून दादांच्या जाण्याने शोक व्यक्त केला.

आळंदी पंचक्रोशीत बुधवारी ( दि. २८ ) माऊली मंदिर परिसरातील महाद्वार चौक, भराव रस्ता आणि श्री शनी मारूती मंदिर भागात व्यापारी, नागरिक, आळंदी ग्रामस्थ यांनी शोक व्यक्त करीत बंद पाळला. गुरुवार ( दि. २९ ) आळंदी शहरात शाळा क्रमांक २ परिसरातील चावडी चौक, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज चौक, आळंदी वडगांव रस्ता, नगरप्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्ता तसेच चाकण चौक भागातील व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवत गुरुवारी आळंदी महाद्वार चौकात आळंदीकर ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या शोकसभेत उपस्थित राहिले. आळंदीतील सर्व पक्षीय संघटना, व्यापारी, विविध सेवा भावी संस्था यांचे वतीने शोकसभेत दादांच्या अचानक जाण्याने अतिशय दुःख झाल्याचे सांगत राज्यात जी पोकळी निर्माण झाली ती कधी हि न भरून येणारी असल्याचे सांगत दादांचे जीवनातील अनुभव सांगत दादांनी केल्या विधायक विकास कामाची माहिती देत आपल्या भावना साश्रू नयनांनी व्यक्त झाल्या. स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पसायदान गायन होऊन शोक सभेची सांगता झाली.

Advertisement

या शोकसभेत माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर, संदीप नाईकरे, नंदकुमार वडगावकर, रुपाली पानसरे, आरिफ शेख यांनी शोक सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी माजी नगरसेवक सागर भोसले, उत्तमराव गोगावले, पुष्पाताई कुऱ्हाडे, राहुल चव्हाण, किरण येळवंडे, नगरसेवक गोविंद कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेत देखील स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रतिमेस पुष्पांहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, नगरसेवक सचिन गिलबिले, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे पाटील आदी उपस्थित होते. आळंदी नगरपरिषदेत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

इंद्रायणी नदी घाटावर दादांना भावपूर्ण आदरांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह ५ जणांचे बारामती येथे दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. पवार कुटुंबियांत तसेच राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधी हि भरून न येणारी आहे. दादांसह ५ मान्यवरांचे अपघातात जाणे या दुर्दैवी संकटातून त्यांचे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती माउलींनी द्यावी अशी प्रार्थना करीत भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल वातावरणात इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने अर्पण करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page