नवक्षितिज मतिमंद कार्यशाळा आंबी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साह व आनंदात साजरा.

SHARE NOW

आंबी:

२६ जानेवारी २०२६ रोजी नवक्षितिज मतिमंद कार्यशाळा, आंबी (ता. मावळ) येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनोद कदंबी, सौ. कनका कदंबी, मा. श्री. हरिश्चंद्र गडसिंग, इनरव्हील क्लब मावळ शक्तीच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई भरत राजीवडे, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. भरत नाना राजीवडे, सेक्रेटरी सौ. सुरैय्या शेख, एडिटर सौ. छाया साळुंखे, क्लब मेंबर सौ. अश्विनी बेंद्रे, व्यवस्थापन विश्वस्त सौ. स्मिता शेट्टी तसेच केंद्रप्रमुख मा. श्री. बाळासाहेब वायाळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजपूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि उत्स्फूर्त नृत्याद्वारे आपली कला, कौशल्य व आत्मविश्वास प्रदर्शित केले. त्यांच्या आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी बनला.

Advertisement

सौ. ज्योतीताई भरत राजीवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा गौरव केला, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि समाजातील प्रत्येक घटकाने त्यांना योग्य संधी देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन गायकवाड यांनी केले तर प्रस्तावना व्यवस्थापन विश्वस्त सौ. स्मिता शेट्टी यांनी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. आशा वायाळ यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा आनंद दुपटीने अनुभवण्यात आला आणि उत्साही व प्रेरणादायी वातावरणात हा समारंभ यशस्वीपणे संपन्न झाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page