प्रा.केशव जाधव व शोभा जाधव यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
तळेगाव दाभाडे
दि.१२. आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सातारा जिल्हा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्य व राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६ मधील गुणवंत शिक्षक पुरस्कार इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.केशव जाधव यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शोभा केशव जाधव सध्या
सरस्वती विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षिका यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.
जाधव दाम्पत्य शैक्षणिक क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून ज्ञानदानाचे काम अविरतपणे करत असलेल्या कार्याची तसेच समाजाप्रती असलेली निष्ठा,प्रेम,शैक्षणिक क्षेत्रातील अनन्यसाधारण काम अनेक गरजूंना दिलासा व आत्मविश्वास देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य असलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे खजिनदार निरूपा कानिटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य प्रा.संदिप भोसले संस्था पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार तसेच सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड प्राथमिक विभाग
मुख्याध्यापक नवनाथ गाढवे तसेच संस्था पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपप्राचार्य संदिप भोसले प्रा.अदिनाथ दहिफळ प्रा.राजेंद्र आठवले प्रा.विजय खेडकर प्रा.अजित जगताप प्रा.योगेश घोडके तसेच सौ.समाधानी भोसले सौ.करुणा जगताप,अर्थव जाधव, निलम यादव,समृद्धी जगताप समिक्षा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.






