लाच स्वीकारताना तलाठी सखाराम कुशाबा दगडे सापळ्यात वडगाव मावळ या ठिकाणी एसीबी ने पकडले रंगेहात

SHARE NOW

वडगाव (मावळ):

शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली त्यातील 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले. वडगाव मावळ येथे सोमवारी दिनांक 18 मार्च रोजी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.

सखाराम कुशाबा दगडे वय 50 असे लाच स्वीकारलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षे व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली. एसीबी चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सखाराम दगडे मावळ तालुक्यातील करुंज येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार 40 वर्षे व्यक्तीच्या शेताच्या गटाची फोड केली त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यायची होती. त्यासाठी तलाठी दगडे याने त्यांच्याकडे 50 हजारांची लाच मागितली याबाबत संबंधित व्यक्तीने एसीबी कडे तक्रार दिली. त्याची 15 मार्च रोजी पडताळणी केली त्यावेळी तलाठी दगडे याने पंचांग समक्ष पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केली त्यातील पहिला हप्ता म्हणून पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरले.

Advertisement

एसीबीच्या पथकाने सोमवारी सापळा लावला त्यावेळी तलाठी दगडे याने लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून पंचवीस हजारांची लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने दगडे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबी चे पुणे येथील पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page