प्रा. सुरेश आत्माराम देवढे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी प्रदान
तळेगाव दाभाडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेअंतर्गत प्रा. सुरेश आत्माराम देवढे यांना नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. देवढे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर या संशोधन केंद्रातून डॉ. शुभांगी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली “ई-प्रशासनाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धती आणि उद्दिष्टपूर्तीवर होणारा परिणाम” या विषयावर
आपले संशोधन कार्य पूर्ण करून प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. संजय कप्तान, प्राचार्य डॉ. अनिल अडसुळे, डॉ. यशोधन मिठारे, डॉ. डी.एस. बोरकर यांचेदेखील सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. प्रा. देवढे यांच्या नावावर दोन पेटंट असून ‘ई सुशासन’ नावाचा संदर्भ ग्रंथही प्रकाशित आहे. सध्या ते तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.






