वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र.5 मध्ये बालिकादिन उत्साहात साजरा

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

Advertisement

दिनांक3 जानेवारी वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी अनिता वैद्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेत हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, वेशभूषा, नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नवनियुक्त नगरसेविका सौ.शैलजाताई काळोखे उपस्थित होत्या. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया दांगट मॅडम यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा व स्त्री शिक्षणाचे महत्त्व उपशिक्षक श्री सागर सांगळे सर यांनी सांगितले. मुलींना विविध स्पर्धात मिळवलेल्या यशाबद्दल बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले. एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण स्त्री शिक्षणासाठी समाज प्रबोधन केले पाहिजे..असे अध्यक्षीय भाषणात सौ.शैलजा काळोखे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास निवृत्त शिक्षिका सौ. चेतना असर, दामिनी पथक प्रमुख सौ. जाधव व त्यांचे सहकारी, शा. व्य.समिती अध्यक्षा सौ. केदारी , विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती सदस्य डॉ.वळसंगकर, तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षिका सौ. मनिषा लांजेकर यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page