“इंद्रधनु :जल्लोष तरुणाईचा” या युवक महोत्सवाचे दमदार उद्घाटन.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी विद्या मंदिर आयोजित “इंद्रधनु: जल्लोष तरुणाईचा” या युवक महोत्सवाचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात, सुप्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या शुभहस्ते पार पडले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, की “या इंद्रायणी महाविद्यालयाच्या भिंती खूप बोलक्या आहेत. येथील भिंतीवरील प्रत्येक चित्रातून तुम्हाला खूप शिकायला मिळते.” प्रा. मोरे यांच्या उपस्थितीतच काव्य वाचन स्पर्धा संपन्न झाली. या युवक महोत्सवांतर्गत 12 विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आज काव्यवाचन, वक्तृत्व, एकपात्री अभिनय, मेहंदी आदी स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. शनिवार दि. 4/10/ 2025 रोजी गायन, वादन, नृत्य या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

 

उद्घाटन प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. मलघे सर यांनी ‘ महाविद्यालयाला मानाचा ‘ पुरुषोत्तम करंडक’ विद्यार्थ्यांनी मिळून दिला आहे. इंद्रायणीमध्ये विद्यार्थी सर्वांगाने संस्कारीत होतो’ असे आवर्जून सांगितले. प्राचार्य डॉ. संजय आरोटे सर (बी. फार्मसी कॉलेज), प्राचार्य डॉ.साहेबराव पाटील सर (यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग) व उपप्राचार्य प्रा. एस.पी.भोसले सर यांनी या युवक महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

Advertisement

या विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रा. आर. आर.डोके, प्रा. कादंबरी घाटपांडे, प्रा.श्वेता मंत्री, प्रा. सत्यजित खांडगे, प्रा. ज्योती क्षीरसागर, श्री. सम्राट काशीकर इत्यादींनी परीक्षण केले.

नाट्य विभाग प्रमुख प्रा. क्षिप्रसाधन भरड, प्रा. आर.आर.डोके सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. हर्षदा पाटील यांनी या युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. तसेच, सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

 

संस्थेचा एकत्रित युवा महोत्सव व्हावा, यासाठी संस्थेचे अध्यक्ष.श्री. रामदास काकडे यांनी विचार मांडला. त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यवाह श्री.चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष श्री. संजय साने, खजिनदार सौ. निरूपा कानिटकर यांनी या युवा महोत्सवास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.कृष्णा मिटकर यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page