पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदी देहूचे रामदास साठे यांची निवड..
पुणे – श्री क्षेत्र देहू येथील शेतकरी कुटुंबातील, वारकरी संप्रदायातील रामदास साठे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी एकमताने निवड झाली. तसे पत्र योगेंद्र पवार यांनी, जगन्नाथ शेवाळे पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी दिले.. रामदास हे युवा उद्योजक असून. फार्मसी पदवीधर आहेत. युवा उद्योजक म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे.. रोटरी संघटनेचे च्या मार्गदर्शनात गेली पंधरा वर्षे ते वृक्षरोपणाचे काम करत आहेत. इंद्रायणी स्वच्छता मोहिमेतही त्यांचा मोठा सहभाग होता. पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या मोहिमेत त्यांनी हिरारीने भाग घेतला होता.. मुळशी तालुक्यातील भाल लगुडी गावचे सरपंच पदवी त्यांनी यापूर्वी भूषवले होते.आदर्श सरपंच म्हणून त्यांनी भालगुडी गावात अनेक रस्ते, पायाभूत सुविधा आणि डिजिटल ग्रामपंचायत केली.. शरद पवार गटाचे कट्टर म्हणून त्यांचा मुळशी त दबदबा आहे. वैचारिक बुद्धिमत्ता, आणि विरोधकांनाही जवळ करणे हे त्यांचे राजकीय सूत्र आहे. विरोधासाठी विरोध करणे यापासून ते चार हात लांबच राहिलेत.. देहू राष्ट्रवादी चे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी रामदास साठे यांच्या निवडीचे स्वागत करताना सांगितले की, अतिशय स्वच्छ प्रतिमा असणारे हे साठे, यांच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने एक चांगला चेहरा दिला आहे.. युवा उद्योजक आणि युवा नेता अमित घेणंद यांनी निवडीचे स्वागत करताना सांगितले की,खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वखाली यांनी राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे.झाडे लावा झाडे जगवा, या उपक्रमातून साठे यांनी खूप मोठे कार्य केलेले आहे. युवा पिढीला यापुढे रोजगार मिळतील अशी अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे, असे अमित घेणंद यांनी सांगितले.. तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे नेते ऍड सुरेश खुर्पे यांनी सांगितले की लवकरच मोठा सत्कार समारंभ देहूकराच्या वतीने करण्यात येईल..या निवडीचे स्वागत मोठ्या आनंदाने होत आहे.





