लालबहादूर शास्त्री हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जोरदार साजरा .*
खडकी :
लालबहादूर शास्त्री हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आनंदात आणि जोशात आपल्या शाळेच्या पटांगणात साजरा करण्यात आला . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत दौंडकर सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पेंडलवार सर उपस्थित होते . आपल्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे सर्व शिक्षक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते . मेळाव्यामध्ये जवळपास तीनशे मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता . कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या वातावरणात होऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेचे जुने दिवस आठवले . एक दिवस शाळेसाठी या भावनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . हे मेळाव्याचे दुसरे वर्ष होते . या मेळाव्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी बेंगलोर, मुंबई, ठाणे, सोलापूर, नगर व अन्य शहरातून आले होते. या मेळाव्यामध्ये सर्व शिक्षकांचे स्वागत आणि सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले . हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने, देणगीतून संपन्न करण्यात आला . मेळाव्यामध्ये जवळपास दहा माजी विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी मनोगत आणि विचार व्यक्त केले .*
लालबहादूर शास्त्री हायस्कूल माजी विद्यार्थीच्या मेळाव्यासाठी मांडवाची व्यवस्था आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री इम्रान तांबोळी यांनी विनामूल्य केले . तसेच लाउडस्पीकर ची व्यवस्था श्री रमजान शेख यांनी विनामूल्य केले . आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक श्री जयवंत वायदंडे यांनी देखील या कार्यक्रमाला आर्थिक मदत केली . या कार्यक्रमासाठी फोटो आणि व्हिडिओ चित्रण आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री योगेश कांबळे व श्री निलेश कांबळे या दोन्ही बंधूंनी विनामूल्य केली . कार्यक्रमाचे वृत्तांकन आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री प्रकाश अनंत यांनी केले . मेळाव्यासाठी परवानगी दिलेल्या खडकी छावणी परिषद , लालबहादूर शास्त्री हायस्कूल शाळा व या कार्यक्रमाला देणगी दिलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रमाला विनामूल्य सेवा देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार .*