पुण्यात सणोत्सवातील डीजे आणि गाणी संदर्भात निवेदन

SHARE NOW

पुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वाहा आणि नागरी समस्या निवारण मंच यांच्या वतीने मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर यांना सणोत्सव काळातील डीजे व गाणी संदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये सणोत्सव काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत विविध मुद्दे मांडण्यात आले असून नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाची कागदपत्रेसुद्धा जोडण्यात आली आहेत. विशेषतः सणोत्सवातील डीजे वापर, रात्री उशिरा वाजणारी गाणी, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्या याबाबत नागरिकांचा आवाज या निवेदनातून पोलिस प्रशासनापर्यंत पोहचवण्यात आला आहे.

Advertisement

निवेदन सादर करताना विधिज्ञ विशाल देशपांडे, विधिज्ञ शिवम् पोतदार, यशवंत बोगम, अश्विनी कुलकर्णी आणि श्रद्धा मराठे हे उपस्थित होते.

यावेळी संबंधितांनी पोलिस प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सण आनंदाचा तसेच सामाजिक सलोखा राखून पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page